esakal | कोणी सावली देईल का?
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी कोलाड येथील झाडे तोडण्यात आली आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी कोलाड येथील सुमारे ४० ते ५० वर्षे जुने मोठे वृक्ष शनिवारी तोडण्यात आले.

कोणी सावली देईल का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहा (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी कोलाड येथील सुमारे ४० ते ५० वर्षे जुने मोठे वृक्ष शनिवारी तोडण्यात आले. अर्धशतकापासून सावली देणारी झाडे तोडल्याने कोलाडवासीयांनी सावली हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. 

२०११ मध्ये सुरू झालेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. या कामात अडथळा ठरू शकणारी शेकडो झाडे आजपर्यंत तोडण्यात आली. यापैकी काही झाडे ही अर्धशतकापासून वाटसरू व नागरिकांना सावली देत होती. कोलाड हे मुंबई- गोवा व पुणे-रोहा रस्त्यावरील महत्त्वाचे गाव असून या ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही वृक्ष गेल्या ४० ते ५० वर्षांपासून आहेत. कोलाडमधील आंबेवाडी नाक्‍यावर जुनी झाडे येथील फेरीवाले, वाटसरू, बसची वाट पाहणारे प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांना कायम आधार वाटायची. जोराचा वारा, पाऊस असल्यास वाटसरू या झाडांच्या आडोशाला उभे राहून संरक्षण करायचे.

अलिबाग-पेण मार्गावरील अपघातात दोन ठार... कसा झाला अपघात?

ऐन उन्हाळ्यात त्यांच्या सावलीचा आधार होता. त्यामुळे ही झाडे तुटल्याने दुःख होत असल्याच्या भावना कोलाड येथील ज्येष्ठ नागरिक बळीराम अडीतकर यांनी व्यक्त केल्या. या झाडांपैकी काही झाडे फायकस प्रकारातील, तर काही रेन ट्री होती. 

शरीरात रक्‍ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊ... कोण बोलले हे?

त्यामुळे या झाडांवर पक्ष्यांचा कायम वावर असायचा. ही झाडे तोडल्याने पक्ष्यांचा किलबिलाट मुका झाला आहे. मात्र विकासाच्या वेगात असे कित्येक मंजूळ आवाज दबून जाणे क्रमप्राप्तच असते, अशा भावना कोलाड येथील निवृत्त वन अधिकारी वसंत साबळे यांनी व्यक्त केल्या. 

loading image