

Drone Delivery Service
ESakal
मुंबई : ड्रोन फर्म स्काय एअर आणि रिअल इस्टेट डेव्हलपर सिद्धा स्काय यांनी एका उपक्रमासाठी एकत्र येऊन काम केले आहे. ज्याचा उद्देश मुंबईत स्मार्ट आणि शाश्वत शहरी राहणीमानाचे उपाय प्रदान करणे आहे. स्काय एअर वडाळ्यातील सिद्धा स्काय हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांसाठी मुंबईत पहिला ड्रोन डिलिव्हरी इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करणार आहे. ज्यामध्ये सोसायटीमध्ये पहिला स्काय-पॉड बसवण्यात येणार आहे. कॉम्प्लेक्समधील नियुक्त स्काय-पॉड झोनमध्ये रहिवाशांना ड्रोनद्वारे सुरक्षित आणि अखंड डिलिव्हरी मिळतील.