

Rice Price Hike
ESakal
वाशी : साखरेपाठोपाठ दररोजच्या जेवणातील अविभाज्य भाग असलेल्या तांदळाचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना ऐन सणासुदीत महागाईची झळ अधिक बसणार आहे. मागील महिन्याभरात तांदळाच्या भावात सुमारे ११ टक्के वाढ झाल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही दिसत आहे. परिणामी दिवाळीपर्यंत मागणीत वाढणार असल्याने तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.