

Bandra Accident
ESakal
मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एका महिला कारचालकाने फोनवर बोलत भरधाव वेगात कार चालवत असताना एका आठ वर्षांच्या लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली. रविवारी झालेल्या या घटनेत अंश गुप्ता (वय ८) याचा मृत्यू झाला असून तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अंशाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडताच आरोपीकडून साक्षीदाराला पैशांची ऑफर दिल्याचे समोर आले आहे.