Rickshaw Fare Hike: एक रुपया अमान्य, रिक्षाचे किमान भाडे ३० रुपये करा; रिक्षा दरवाढीवरून चालक संघटनांमध्ये संताप

Rickshaw Fare: राज्य सरकारने रिक्षा भाड्यात अवघ्या एका रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दरवाढीवरून चालक संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Rickshaw Fare Hike

Rickshaw Fare Hike

ESakal

Updated on

डोंबिवली : मागील दोन वर्षांपासून रिक्षा भाड्यात कोणतीही वाढ झालेली नसताना राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून किमान रिक्षा भाड्यात अवघ्या एका रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढती महागाई, इंधनाचे दर, वाहन देखभाल आणि वाढलेले सरकारी शुल्क पाहता ही भाडेवाढ अत्यल्प असून, सरकारने खटाव समितीच्या शिफारशींनुसार रिक्षाचालकांना महागाई निर्देशांकावर आधारित भाडेवाढ द्यावी, अशी मागणी डोंबिवलीतील रिक्षा संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com