राज्यपाल येती शहरा, तोचि दिवाळी, दसरा...

वसई ः राज्यपाल दौऱ्यावर येण्यापूर्वी वाहने उचलल्याने मोकळे झालेले रस्ते.
वसई ः राज्यपाल दौऱ्यावर येण्यापूर्वी वाहने उचलल्याने मोकळे झालेले रस्ते.

वसई  ः वसई पश्‍चिमेकडील सनसिटी येथील कार्यक्रमासाठी बुधवारी (ता. १६) राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी आले होते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी वसई-विरार महापालिकेची धावपळ सुरू होती. रस्ते चकाचक करण्यात आले. ते येणाऱ्या मार्गावर साफसफाई करण्यात आली. अडसर ठरणारी नेहमीची वाहने रस्त्यांवरून हटवण्यात आली; परंतु कार्यक्रमानंतर राज्यापालांची पाठ फिरताच गुरुवारी (ता. १७) पुन्हा वाहनांचे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे असल्याने नागरिकांनी संपात व्यक्त केला.

बेवारस वाहने, रस्त्यांवर थाटलेली गॅरेज आदींवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा केली; मात्र याबाबत धोरणच निश्‍चित करण्यात आले नाही. वाहतूक विभागासमोर यामुळे कोंडीचे आव्हान निर्माण होत आहे.

शोरूममधील वाहने, रस्त्याच्या कडेला असणारी गॅरेजमधील दुरुस्तीची वाहने याचबरोबर अन्य वाहनांना याचा अडथळा होतो; मात्र थातुरमातुर कारवाई करून, कारवाईचे छायाचित्र काढून समाधान मानले जाते. करदात्यांच्या पैशांतून रस्ते तयार केले जातात; परंतु याच रस्त्यावर व्यवसाय केला जातो.

बुधवारी मात्र वसईत राज्यपाल कोश्‍यारी येणार असल्याची चुणूक लागताच पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. टोईंग कामगारांनी वसई शंभर फूट मार्ग, साठ फूट मार्ग, अंबाडी रोड येथील दुचाकी, चारचाकी, टेम्पो यासह अन्य अवजड वाहनेदेखील उचलली. रस्त्यांवर साफसफाई करण्यात आली. यामुळे नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले; मात्र पालिकेची ही धडक मोहीम एकाच दिवसापुरती मर्यादित होती. गुरुवारी पुन्हा याच मार्गावर गॅरेजमध्ये येणारी दुरुस्तीची वाहने उभी करण्यात आली आहेत.

रस्त्यावर होणारी अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. पुन्हा रस्त्यावर वाहने उभी असतील, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. अतिक्रमण विभागाला सूचना देऊन कार्यवाही करू. 
ग्लिसन गोन्साल्विस, 
सहायक आयुक्त, नवघर-माणिकपूर प्रभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com