Mumbai Crime : एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करत भामट्यांची लुबाडणूक

महात्मा फुले पोलिसांनी एकाला केले अटक ,तब्बल 92 एटीएम कार्ड पोलिसांनी केले हस्तगत
Mumbai Crime
Mumbai Crime esakal

डोंबिवली : एटीएम मशीन मधून पैसे काढता न येणाऱ्या नागरिकांच्या मदतीला तो पुढे जायचा. एटीएम कार्डचा पिन कोड जाणून घेत कार्डची अदलाबदल करत नागरिकांना दोघा भामट्यांनी लुबाडले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक जा याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. दीपक यांच्याकडून तब्बल 92 एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

Mumbai Crime
Baramati News : बारामतीत इन्स्टाग्रामवरील स्टेटस पोलिसांनी तपासले अन पिस्तूलाची देवाणघेवाण करणारी साखळीच समोर आली

कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी एका भामटाने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करत पैसे काढल्याची तक्रार नोंदवली होती. त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या. त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला पैसे निघाले नाही. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचा संदेश त्यांना आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Mumbai Crime
Latur News : लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैशाचा तुटवडा

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता त्यात दोन तरुण कैद झाले. पोलिसांनी त्यांची ओळख पटवत गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती काढली. व सापळा रचत दीपक याला अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. दीपक झा याच्याकडून विविध कंपन्याचे 92 एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

अशा पध्दतीने करायचा हातचलाखी

दीपक एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात अनेक नागरिक एटीएम सेंटरमध्ये येतात. ज्यांना एटीएम ऑपरेट करता येत नाही. त्याची माहिती नसते. अशा नागरिकांना दीपक व त्याचा साथीदार हेरायचा. असे नागरीक जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यास जात त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे. पीन कोड काय टाकला जात आहे ते पाहून घ्यायचे. बोलण्यात गुंतवून हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. दुसरा एटीएम कार्ड त्या नागरीकांच्या हाती द्यायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढण्याचे नाटक करायचे. पैसे निघत नसल्याने नागरीक घरी जायचे. त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरीजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com