एक नंबर ! ठाण्यातील सिग्नल शाळेची 'रोबोटिक' भरारी...

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

ठाण्यातील बहुचर्चित सिग्नल शाळेतील मुले या शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना पहिलीपासूनच शास्त्रशुद्ध रोबोटिकचे ज्ञान मिळावे, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत येथील सिग्नल शाळेत रोबोटिक लॅब सुरू करण्यात आली आहे. फक्त रोबोटिक शिकविणारी ही पहिली शाळा ठरणार आहे.

ठाणे : आपल्या देशाने गेल्या काही वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानात आणि अवकाश क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढील पायरी म्हणजे "रोबोटिक सायन्स' आहे. ठाण्यातील बहुचर्चित सिग्नल शाळेतील मुले या शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना पहिलीपासूनच शास्त्रशुद्ध रोबोटिकचे ज्ञान मिळावे, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत येथील सिग्नल शाळेत रोबोटिक लॅब सुरू करण्यात आली आहे. फक्त रोबोटिक शिकविणारी ही पहिली शाळा ठरणार आहे. शुक्रवारी, सकाळी 10 वाजता खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या लॅबचे उद्‌घाटन होणार आहे. 

भिवंडीत एमआयएमची सभा रद्द

ठाणे तीन हात नाका येथील सिग्नल शाळा ही गेल्या चार वर्षांपासून सिग्नलवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना अद्ययावत शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या वर्षी सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा शाळेत उभारण्यात आली. त्याचे फलित म्हणून राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात मुलांनी सातवा क्रमांक पटकावला आणि शाळेची दोन मुले इस्त्रो भेटीसाठी निवडण्यात आली.

म्हणून तीने कोर्टात जाऊन वकिलाला केली मारहाण

विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षणातील पुढील टप्पा म्हणून 'रोबोटिक सायन्स'चे शिक्षण मुलांना मिळावे यासाठी सिग्नल शाळेत स्वतंत्र रोबोटिक लॅब उभारण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या लॅबचे उद्‌घाटन होईल. यावेळी महापौर नरेश म्हस्के, शिक्षण विभाग सभापती विकास रेपाळे हेही उपस्थित राहाणार आहेत. 

लॅबमध्ये काय शिकता येणार 
"एसबीआय लाईफ इन्शुरन्स' यांच्या सहकार्याने ही लॅब सुरू होत असून, रोबोटिक्‍स प्रोग्रामिंग करणे, प्रत्यक्ष रोबो तयार करणे आदी शिक्षण मुलांना रोबोटिक लॅबमधून मिळणार आहे. रोबोटिक शिक्षणाचा वर्षभराचा स्वतंत्र अभ्यासक्रम "चिल्ड्रन टेक सेंटर'ने यासाठी तयार केला आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व मुलांना यामुळे रोबोटिक शिकायला मिळणार असल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत यांनी दिली.

 'Robotic lab' in Thane Signal School's  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Robotic lab' in Thane Signal School's