PHOTO : जेंव्हा रोहित पवार त्यांच्या मनातील मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त करतात

PHOTO : जेंव्हा रोहित पवार त्यांच्या मनातील मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त करतात

मुंबई : रोहित पवार यांच्या ग्राउंड झिरोवरील कामामुळे, त्यांच्या तळागातील जनतेच्या संपर्कामुळे, थेट जनतेत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्याच्या सवयीमुळे रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या तरुणांचे आकर्षण बनले आहेत. अनेक सभांमधून, अनेक दौऱ्यांमधून याबाबतची झलक आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली आहे. केवळ पक्षात किंवा महाविकास आघाडीतील नेते नव्हेत तर इतर मित्रपक्षातील आणि अगदी भाजपतीलाही काही नेते रोहित पवारांच्या कामाबद्दल, त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाबाबत कायम समाधान व्यक्त करतात. दरम्यान रोहित पवार यांनी काल मुंबईतील विविध भागांमध्ये फेरफटका मारला. फेरफटका मारण्यासोबतच रोहित पवार यांनी अनेक मुंबईकरांशी संवाद साधला. त्याचे प्रश जाणून घेतले. या फेरफटक्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या मनात असणारं मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी मुंबईबद्दल लिहिलंय...  

"देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी, कोणालाही उपाशी झोपू न देणारं शहर अशी कितीतरी विशेषणं मुंबईला दिली जातात, किंबहुना ही वस्तुस्थिती आहे. अशा मुंबईचं आकर्षण कुणाला नाही? माझं तर कॉलेजचं शिक्षणही याच मुंबईत झालंय आणि मुंबई आपली राजधानीही आहे. त्यामुळं मुंबईविषयी कुणी काही तारे तोडत असलं तरी महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांनाच मुंबईचं आकर्षण आहे मुंबईवर प्रेमही आहे.

मुंबई आपली आहे, हीच भावना मनाला नेहमी सुखावत असते. काल असंच मुंबईतील दिवसभराची कामं उरकल्यानंतर संध्याकाळी 'वरळी सी लिंक' परिसरात मित्रासोबत फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो. गप्पा मारत झगमगत्या मुंबईला मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होतो, मुंबईचं सौन्दर्य डोळ्यांत साठवत होतो. त्याच वेळी मला ओळखणाऱ्या एक व्यक्तीने 'आमच्या कोळीवाड्यालाही भेट द्या', अशी विनंती केली आणि मीही लगेच होकार दिला.

त्यांना दिलेला शब्द पाळायचा असल्याने मग लगेचच कोळीवाड्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि लगेच तिकडं पोचलो. वास्तविक मास्क असल्याने कुणी ओळखत नव्हतं, त्यामुळं सुरवातीला बिनधास्त होतो, पण नंतर काही चतुर तरुणांनी ओळखलंच. मग त्यांच्यासोबत फोटो काढत, गप्पा मारत इतरही अनेकजण भेटले. तिथं जवळच एक लग्न समारंभ सुरू होता. तिथलेही काहीजण भेटले असता त्यांच्याशी गप्पा मारल्या. पुढं 'श्री. सरस्वती ब्रॉस बँड' पथकाचा सराव सुरु होता. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या कलेला दाद देत त्यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली, सोबत फोटो काढले. कोळी बांधव होड्या उभ्या करतात त्या ठिकाणीही भेट देऊन तिथल्या तरुणांसोबत संवाद साधला. अनेक विषयांवर आम्ही चर्चा केली.

इथंच माझ्या मतदारसंघातील राशीन, जामखेड या भागातील काही मंडळीही भेटली. त्यांना भेटून तर खूप आनंद झाला. वरळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष बाळू साठे यांचीही तिथं भेट झाली. त्यांनी आग्रहाने जवळच असलेल्या त्यांच्या घरी नेलं. घरी चहा घेत त्यांच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारल्या. माझ्या परिचयाचे अमीर जगताप यांच्याही घरी भेट दिली. 'वरळी फोर्ट'लाही भेट दिली.

एकूणच वरळी सी लिंक आणि कोळीवाडा भागातील माणसांना भेटून खूप छान वाटलं. पर्यावरणमंत्री आदित्य जी ठाकरे यांचा हा मतदारसंघ. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे लोक इथं आहेत. या लोकांचे असलेले प्रश्न सोडवण्याचा आदित्य जी प्रयत्न करतच आहेत, त्यामुळं पुढच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास आहे."

rohit pawar writes post on facebook and express his love and feelings about mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com