एमएमआरडीएच्या ताफ्यात आले हे अनोखे मशीन; जाणून घ्या काय उपयोग आहे तर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने, उद्योगधंदे एवढेच नव्हे तर देशभरातील विकासकामेही ठप्प पडली. त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेली विकासकामे आता टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. 

मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने, उद्योगधंदे एवढेच नव्हे तर देशभरातील विकासकामेही ठप्प पडली. त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेली विकासकामे आता टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. मुंबईतील विविध विकासकामांसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाचेही काम सुरु झाले आहे. 

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

मेट्रोच्या काम कमी कालावधीत वेगाने होण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केल्या जात आहे. मेट्रोची डबे ने-आण करण्यासाठी तसेच बंद पडलेली मेट्रो पुन्हा कारशेडमध्ये नेण्यासाठी वापरण्यात येणारे पहिले रेल रोड मूव्हर मशीन एमएमआरडीएच्या ताफ्यात दाखल झाले आहे. हे मशीन रेल्वेरूळ तसेच रस्त्यावर देखील चालवता येणार आहे. 

मोठी बातमी ः कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

आरआरएम मशीन मे. झेफिर एस.पी.ए., इटली येथून खरेदी करण्यात आले आहे. या मशीनची किंमत 1.89 कोटी रुपये असून 24 फेब्रुवारी रोजी इटलीवरून हे मशीन रवाना करण्यात आले; मात्र लॉकडाऊनमुळे मुंबईत बंदरावर ते 5 एप्रिल रोजी दाखल झाले आणि तेथून चारकोप डेपोत 22 मे रोजी हे मशीन दाखल दाखल झाले. 

मोठी बातमी ः कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

मेट्रो 2 अ ,मेट्रो 7 च्या कामांना वेग  
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ठप्प झालेल्या मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांना आता वेग आला असला तरी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकांना एप्रिल 2021 पर्यंत  विलंब होणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सुरू असून रस्त्यावरील वाहतूक मर्यादित असल्यामुळे 24 तास काम सुरू ठेवण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.  यामध्ये अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेवरील नॅशनल पार्क मेट्रो स्थानकाजवळ  वीज पुरवठा करणारी यंत्रणा दाखल करण्यात आली आली. तसेच डीएननगर ते दहिसर मेट्रो 2 ए या मार्गिकेसाठी इलेक्ट्रिकल पार्ट्स दाखल झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rrm machine arrived at mmrda charkop metro project