RTE: पालकांनो चिंता नको! लॉकडाऊननंतर निवड झालेल्या शाळेतच पाल्याला प्रवेश मिळणार

RTE
RTE

ठाणे : लॉकडाऊनमुळे  आरटीई प्रवेशाबाबत अनेक पालकांच्या मनात मुलांच्या शाळाप्रवेशाबाबत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. पण आपल्या पाल्याला निवड झालेल्या शाळेतच लॉकडाऊन नंतर प्रवेश मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच याबाबत आरटीईच्या संकेतस्थळावर देखील माहिती देण्यात येणार आहे.

समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण विनामुल्य मिळावे यासाठी शासनाच्या वतीने या घटकातील बालकांसाठी इयत्ता 1 लीच्या मंजूर जागांच्या 25 टक्के प्रवेशासाठी त्या-त्या शाळांच्या स्तरावर राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यांमध्ये देखील 25 टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

 त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यात देखील ही प्रवेश प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2020 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातील 669 शाळांचा समावेश असून 12 हजार 929 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यात नुकत्याच राबविण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून 20 हजार 340 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी पहिली निवड प्रक्रिया राज्य स्तरावर पार पडली असून त्यात 9 हजार 326 जणांची निवड करण्यात आली. तसेच पालकांना शाळा प्रवेशाबाबतचे संदेश देखील मोबाईलवर प्राप्त झाले आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मागील महिना दीड महिन्यापासून शाळा देखील बंद आहेत. त्यात आरटीई प्रवेशाबाबत पालकांना संदेश प्राप्त झाला असून प्रवेश न घेतल्यास आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही ना, प्रवेश निश्चित नाही केला तर, त्याला मिळालेली शाळा रद्द होईल का अशा अनेक प्रश्नांनी पालकांच्या मनात घर केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विचारले असता, पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांच्या पाल्यांची निवड झालेल्या शाळेतच त्याला प्रवेश मिळणार आहे. 

संचारबंदी उठल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया
 प्रवेश प्रक्रिया संचारबंदी उठल्यानंतर अथवा शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतरच सुरु होणार आहे. त्याबाबतची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावरुन पालकांना प्राप्त होणार असून तसा संदेश देखील मोबाईलवर प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
 

RTE: Don't worry parents! After lockdown, the child is admitted to the selected school

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com