शिक्षण हक्कात बिघाडाचा अडथळा...काय आहे हा अडथळा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सुरू झालेल्या शाळा प्रवेशप्रक्रियेची वेबसाईट तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला खीळ बसली असून पालक हवालदिल झाले आहेत.

अलिबाग : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सुरू झालेल्या शाळा प्रवेशप्रक्रियेची वेबसाईट तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला खीळ बसली असून पालक हवालदिल झाले आहेत. पुणे येथील नॅशनल इन्फर्मेशन सेंटरकडे (एनआयसी) वेबसाईटची जबाबदारी आहे. 

‘आरटीई’नुसार पुढील वर्षाच्या शाळा-प्रवेशासाठी १२ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. तिची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी आहे. रायगड जिल्ह्यासाठी या कायद्यानुसार २६६ खासगी शाळांमध्ये  ४ हजार ४८० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लॉटरी पद्धतीने त्याचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे पालक मुलाची ऑनलाईन नोंदणी करत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून  ४ हजार ४२२ अर्ज आले आहेत. परंतु नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्‍यक असलेला ‘लॉगीन एसएमएस’ जात नसल्याने पालक हतबल झाले आहेत. ही समस्या बुधवारी (ता.१९) सायंकाळपासून सुरू झाली. 

वाचा हे ही.... वाईट बातमी : यावर्षी पगारवाढीची अपेक्षा ठेवू नका, कारण...

‘आरटीई’ नवीन नोंदणी करणाऱ्या ‘युजर्स’साठीच ही समस्या येत आहे. पालकांचा खोळंबा होऊ नये यासाठी वेबसाईटवर सूचना टाकण्यात आली आहे. संदेश पाठविण्याचा कोटा संपलेला आहे. ही समस्या 
लवकरच सुटेल.
- निनाद निगले, तंत्रज्ञ, समग्र शिक्षा अभियान, (राजिप)

‘आरटीई’नुसार दोन दिवस नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कधी ‘इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी’मुळे; तर कधी ‘सर्व्हर’मुळे नोंदणी होत नाही. 
- धीरज पाटील, पालक, अलिबाग

... आणि तिने मारली स्कॉयवॉकवरून उडी.... का मारली असेल तिने उडी, वाचा

काय आहे ‘आरटीई’?
मुलाचे शिक्षण खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये व्हावे, असेही काही पालकांचे स्वप्न असते; पण भरमसाठ फीमुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या पालकांना ते शक्‍य होत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा कायदा आहे. त्यानुसार आरक्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न पालक करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE Website jam during admission