...आणि तिने मारली स्कायवॉकवरून उडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

वसई रेल्वेस्थानकाजवळील घटना

वसई : वसई रेल्वेस्थानकाजवळील स्कायवॉकवरून उडी घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावर माणिकपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

वसई स्थानकाच्या पश्‍चिमेकडील स्कायवॉकवर मंगळवारी (ता.19) सकाळी साडेसहाच्या सुमारास काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी काय झाले पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना महिला पडली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली व माणिकपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

महत्त्वाची बातमी - आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

परंतु महिलेला रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. सुंनदा ब्रिद (73) असे या महिलेचे नाव असून ती वसई येथील मिस्त्रीनगर येथे राहत होती. सततच्या आजारपणाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. 

web title : she jumped off the skywalk


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: she jumped off the skywalk