दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वाहन मिळणे अशक्य

परिवहन विभागाच्या ‘वाहन’ संकेतस्थळावर गत १५ दिवसांपासून नेटवर्कची समस्या असल्याने वाहन नोंदणीला अडथळा
rto Vehicle registration blocked due network problem Transport Department last 15 days mumbai
rto Vehicle registration blocked due network problem Transport Department last 15 days mumbaisakal

मुंबई : परिवहन विभागाच्या ‘वाहन’ संकेतस्थळावर गत १५ दिवसांपासून नेटवर्कची समस्या असल्याने वाहन नोंदणीला अडथळा निर्माण झाला आहे. विक्रेत्यांकडून परिवहन विभागाला वारंवार विचारणा केली जात असली, तरी समस्या मात्र सुटलेली नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील वाहन संकेतस्थळावरील काम ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणण्याच्या विचारात असलेल्या नागरिकांचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) माध्यमातून सुरू असलेल्या ‘वाहन’ नेटवर्कमध्ये देशभरात समस्या निर्माण झाली आहे. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर नेटवर्कमधील अडचणीमुळे नव्या वाहनांची नोंदणीसह आरटीओ कार्यालयांतील विविध कामांचा खोळंबा सुरू होत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना वारंवार आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.

देशातील १२०० आरटीओ कार्यालये एकाच संकेतस्थळावर काम करतात, तर दररोज पाच ते दहा लाख नागरिकही संकेतस्थळाला भेटी देतात. त्यामुळे अनेकदा ‘वाहन’च्या नेटवर्क प्रणालीत अडथळे निर्माण होतात. गेल्या आठवड्यात देशभरात समस्या झाली होती. सध्या कोणतीही समस्या नाही.

- संदेश चव्हाण, प्रभारी उपायुक्त, परिवहन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com