esakal | 'सामना' पाहताच अजित पवार म्हणाले हा तर आमचाच पेपर
sakal

बोलून बातमी शोधा

'सामना' पाहताच अजित पवार म्हणाले हा तर आमचाच पेपर

'सामना' पाहताच अजित पवार म्हणाले हा तर आमचाच पेपर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावरून विरोधक ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज विधानसभेत वर्तमानपत्रांचे कात्रणं वाचताना सामनाचं कात्रण आल्यावर "हा तर आपलाच पेपर" आहे असं अजित पवार यांनी म्हंटलंय.

हेही वाचा : एक नंबर! कोरोनावर 'तिने' केली मात,वाचा त्या 'फायटर' महिलेची फेसबुक पोस्ट..

आजविधासभेत अर्थ संकल्पावर चर्चा घेण्यात आली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असल्याचं म्हटलं. मात्र अनेक वृत्तपत्रं आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या आहेत असा अजित पवार यांनी म्हंटलं. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणं दाखवली. यावेळी सामनातल्या बातमीचं कात्रण अजित पवारांच्या हातात आलं.  हे कात्रण हातात येताच 'हा' तर आमचाच पेपर आहे" असं अजित पवार यांनी म्हंटलंय. 

तुम्ही 'सामना' वाचतच नव्हता:

हा तर आमचाच पेपर आज असं अजित पवार यांनी म्हंटल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी अजित पवारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना "चंद्रकांत दादा तुम्ही कधी 'सामना' वाचतच नव्हता" असा खोचक टोला अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपला लगावलाय. 

हेही वाचा: आता मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व गाड्या 'नाना शंकरशेठ' स्थानकातून सुटणार..

आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत:

महाविकास आघाडीच्या सरकारच्या अर्थसंकल्पात प्रादेशिक समतोल राखण्यात आलेला नाही, असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात होता. अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कुठेही दिसत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस करत होते. मात्र अजित पवार यांनी प्रादेशिक असमतोलाचा आरोप फेटाळून लावला. "आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील", असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.  

Saamna is our newspaper said ajit pawar read full story