धक्कादायक ! हिंगणघाटनंतर आता मीरारोडमध्ये 'छपाक'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

हिंगणघाटमधील जळीतकांड ताजं असतानाच ठाण्यानजीकच्या मीरारोडमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मीरारोडच्या काशिमीरा परिसरात आणखीन एक 'छपाक' घटना समोर आलीये. या घटनेमुळे समाजातील विकृती पुन्हा एकदा समोर येताना दिसतेय. 

हिंगणघाटमधील जळीतकांड ताजं असतानाच ठाण्यानजीकच्या मीरारोडमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मीरारोडच्या काशिमीरा परिसरात आणखीन एक 'छपाक' घटना समोर आलीये. या घटनेमुळे समाजातील विकृती पुन्हा एकदा समोर येताना दिसतेय. 

मोठी बातमी - नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन... 

त्यादिवशी ही तरुणी घरी जात होती. घरी जाताना हा आरोपी दबा धरून बसला होता. या आरोपीने शिताफीने या तरुणीचा पाठलाग केला. मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या आरोपीने या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकला. यानंतर तरुणीने आरडाओरड केल्यावर हा विकृत तरुण तिथून पळून गेलाय. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हा विकृत तरुण, या तरुणीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास सांगत होता. मात्र या तरुणीने गुन्हा मागे घेण्यस्तही नकार दिल्याने या विकृताने 26 वर्षीय तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकलाय. या घटनेमुळे सध्या काशिमीरा परिसरात संतापाचं वातावरण आहे. 

मोठी बातमी - शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..

या घटनेनंतर या तरुणीला भाईंदरच्या  भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकल्याने या तरुणीच्या तोंडाला आणि डोळ्यांना दुखापत झालीये. सदर तरुणीवर रुग्णालयात उपचार झाल्यानंतर तिला आता घरी सोडविण्यात आलंय. तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र या घटनेने या तरुणीला मोठा मानसिक धक्का बसलाय. 

या प्रकरणी तात्काळ कारवाई करत काशीमिरा पोलिसांनी या विकृत आरोपीला अहमदाबादमधून बेड्या ठोकळ्यात.

sad indecent of acid attack in kashimira area of mira road cops caught accused from ahemdabad 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sad indecent of acid attack in kashimira area of miraroad cops caught accused from ahemdabad