

Yunus Shaikh joins Shinde Shivsena
ESakal
ठाणे : एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) हिचे वडील युनुस शेख (Yunus Shaikh) यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिंदेसेनेत मानाचं पान देण्यात आलं असून त्यांची एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.