Sakal Impact: अखेर, कुर्लोदमध्ये पुलाच्या बांधकामाला मुहूर्त झाला.

'सकाळ' च्या बातमी ने आदिवासींना मिळाली सुविधा.
Sakal Impact: अखेर, कुर्लोदमध्ये पुलाच्या बांधकामाला मुहूर्त झाला.

Palghar News:   गतसाली मोखाड्यातील अतिदुर्गम कुर्लोद ग्रामपंचायती मधील शेड्याचापाडा येथील सुरेखा भागडे या आदिवासी गर्भवती महिलेला नदीच्या प्रवाहातुन ओंडक्यावर बसुन रस्त्याचे दुसरे टोक गाठावे लागले होते. या घटनेची सर्व प्रथम सकाळ ने " गर्भवतीचा ओंडक्यावरून प्रवास " या मथळ्याखाली  26  जुलै 2023  ला पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध केली होती.

त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या पुलासाठी तातडीने तांत्रिक अडथळे दूर करत येथे पुलं बांधण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. अखेर या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले असुन, प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येथील आदिवासींचा खडतर प्रवास आता लवकरच सुखकर होणार आहे. 

Sakal Impact: अखेर, कुर्लोदमध्ये पुलाच्या बांधकामाला मुहूर्त झाला.
Palghar News : मोखाडा येथे "बालगोकुळम् " कार्यक्रमाचे आयोजन ; गोकुळमात गोपी, गोपीकांनी लुटला आनंद

मोखाड्यातील कुर्लोद ग्रामपंचायती मधील गारगई - पिंजाळ नदीपलीकडे वसलेल्या शेड्याचापाडा येथील सुरेखा लहु भागडे या आदिवासी गर्भवती महिलेला  25 जुलै 2023  रोजी प्रसुती वेदना असह्य झाल्या होत्या.

त्यामुळे या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने ओंडक्यावर बसुन नदीपार करावी लागली होती. या गंभीर घटनेची बातमी सकाळ ने सर्व प्रथम पहिल्या पानावर " गर्भवती चा ओंडक्यावरून प्रवास " या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती.

बातमी चे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. सरकार आणि यंत्रणा खडबडून जागी झाली होती. तत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या घटनेची सकारात्मक दखल घेतली होती.

           त्यावेळी या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनानेही येथील आदिवासींच्या मदतीसाठी तातडीने बोट ऊपलब्ध करून दिली होती.

त्यामूळे तत्कालीन परिस्थितीत कुर्लोद मधील संपर्कहिन पाड्यांसाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही बोट आरोग्य दुत बनली व कुर्लोद ग्रामपंचायती मधील रायपाडा, आंबेपाडा, जांभुळपाडा आणि शेड्याचापाडा या नदीच्या पलीकडे वसलेल्या गांवांची आरोग्य सेवा सुकर झाली होती. तथापी विस्तीर्ण नदी पात्रावरील पुलाचा मुलभूत यक्षप्रश्न कुर्लोद आणि परिसरातील गांव पाड्यातील ग्रामस्थांची कायमची डोकेदुखी होती.

त्यासाठी स्थानिक आमदार सुनिल भुसारा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि भाजप तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली. 

Sakal Impact: अखेर, कुर्लोदमध्ये पुलाच्या बांधकामाला मुहूर्त झाला.
Palghar : मोखाड्यात विहीरींनी गाठला तळ ; 21 गावपाड्यांना 9 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

अडथळ्यांच्या शर्यतीतून पालकमंत्र्यांकडुन मंजुरी...

तत्कालीन आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सवरा यांनी या पुलासाठी  2  कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.तथापी नदी पात्र मोठे असल्याने तब्बल  8 स्लॅबचा पुल, याठिकाणी उभारण्याची गरज होती.त्यासाठी अपेक्षित निधी निधीची अडचण होती.

तसेच निकषांत बसत नसल्याने पुलाचा प्रस्ताव धुळ खातं पडून होता. तसेच रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असल्याने या नियमांत बदल करून मार्ग व पुल  5054 - 04  या शिर्षाखाली, बिगर आदिवासी क्षेत्रांतर्गत विशेष बाब म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी  5  कोटी रूपयांची मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

पालकमंत्री यांच्या आदेशाने मी जातीने याकामात लक्ष दिले होते. अनेक नियमांचा अडसर यामध्ये होता. मात्र, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील आदिवासींसाठी नियमांत बदल करत, ग्रामीण रस्ता असूनही हा पुलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बांधण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पुर्ण केल्या आहेत.

या पुलाच्या बांधकामासाठी  5  कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज प्रत्यक्ष पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

* संतोष चोथे, भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष.

Sakal Impact: अखेर, कुर्लोदमध्ये पुलाच्या बांधकामाला मुहूर्त झाला.
Palghar : मोखाड्यात विहीरींनी गाठला तळ ; 21 गावपाड्यांना 9 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com