esakal | Sakinaka Case: "आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय द्या"
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

Sakinaka Case: "आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय द्या"

sakal_logo
By
जीवन तांबे

चेंबूर : मुंबई येथील साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 30 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर (woman rape) तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी घालण्याची अमानुष घटना घडली होती. शस्त्रक्रिया निष्फळ ठरण्याने पीडितेचा मृत्यू (victim death) झाला आहे. या घटनेनंतर विवीध संघटनांनी पिडीतेच्या कुटुंबाची भेट घेतली. पिडीतेच्या कुटुंबियांना न्याय (family justice) मिळण्यासाठी आंदोलन (strike) करण्याचा इशारा भीम आर्मी या संघटनेनें दिला आहे.

हेही वाचा: आधार नोंदणी नसली तरी विद्यार्थ्यांची होणार पटनोंदणी; शिक्षण संचालकांचे आदेश

राजावाडी रुग्णालयात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पीडित महिलेच्या आईची भेट घेऊन सांत्वन केले. कुटुबाला राहण्यासाठी घर बांधुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर रिपाई (आठवले) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या चित्रा वाघ, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट पीडितेच्या घरी भेट दिली.

दरम्यान पीडितेच्या आईने गेल्या कित्येक वर्षांपासून भाजीपाल्याचा धंदा करुन उदरनिवाह आम्ही करीत आहोत. आम्ही गरीब आहोत.कष्ट करून जगत आहोत. या गरिबीची फायदा घेऊन जाणून बुजून या नराधमांनी माझ्या मुलीचा बळी घेतला आहे. एका आरोपींला आता पर्यंत अटक केली आहे.मला पोलिसांनीं आतापर्यंत एफआयआरची कॉपी दिला नसल्याचा आऱोप केला आहे. रुग्णालयातून कोणती रिपोर्ट आला नसताना देखील पोलीसांनी तुमच्या मुलीने दारु प्यायली होती असा चुकीचा आरोप केल्याचे गाऱ्हाणेही त्यांनी माडले. आरोपीची माझ्या मुलीशी पाच सहा वर्षांपासून ओळख होती. त्याने बाहेर अडवून काही काम असल्याचे सांगत टेम्पोत घेऊन गेला आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचं पिडीतेच्या आईने म्हटले आहे.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

दरम्यान पीडित कुंटूंबाला भेटण्यासाठी भीम आर्मीचे मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलीसांनी त्यांना अडविले. भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलीसांनी पिडीत कुंटूंबाची भेट करून दिली. पीडित कुंटूंबाला न्याय मिळावा आरोपींना अटक करा, फाशीची शिक्षा देण्याची मागणी भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केली.

"सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे,जो पर्यंत पीडितेच्या कुटुंबियांना न्याया मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरू ठेवणार असल्याचे आहे. रविवारी साकिनाका पोलीस ठाण्याला घेराव घालणार आहोत."

- योगिनी पगारे ( मुंबई भीम आर्मी उपाध्यक्षा )

loading image
go to top