esakal | Rave Party : आर्यनच्या अटकेनंतर सलमान खान पोहोचला शाहरुखच्या घरी
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan_Salman Khan

आर्यनच्या अटकेनंतर सलमान खान पोहोचला शाहरुखच्या घरी!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : रेव्ह पार्टीत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीनं अटक केली. यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. या घटनेनंतर अभिनेता सलमान खान याने शाहरुख खानची त्याच्या मन्नत बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

सलमान खान कारमधून शाहरुख खानच्या बंगल्यावर आल्याचं एका फोटोग्राफरनं आपल्या कॅमेरॅत टिपलं. यानंतर हा व्हिडिओ माध्यमांतून व्हायरल झाला. सलमान खाननं कारमधून बाहेर येत कोणाशीही संवाद साधला नसला तरी कारमध्ये बसून शाहरुखच्या घरी पोहोचल्याची त्याची छबी कॅमेरॅत बंद झाली.

हेही वाचा: Rave Party : आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!

आर्यनला अटक झाल्यानतंर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी सलमान त्यांच्या घरी धाव घेतल्याची चर्चा आहे. भलेही शाहरुख आणि सलमान यांच्यातील नातं गहरं मित्रात्वाचं नसलं तरी या संकटकाळात आधार देण्यासाठी तो शाहरुखच्या भेटीसाठी पुढे आला आहे.

loading image
go to top