

Sandeep Deshpande latest political comment
esakal
Mumbai Mahapalika : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले मनसे नेते संतोष धुरींनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. संतोष धुरी यांच्यानंतर आता संदीप देशपांडेही भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा सुरू असतानाच देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. आमच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्यात नाराज असण्याचे काही कारण नाही. मी नाराज नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नसल्याच्या चर्चाणा त्यांनी पूर्णविराम दिला.