तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही ना? होतोय हानिकाराक वस्तूंचा वापर!

तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही ना? होतोय हानिकाराक वस्तूंचा वापर
तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही ना? होतोय हानिकाराक वस्तूंचा वापर

मुंबई : कोरोना काळात वाढत्या सॅनिटायझरचा वापर पाहून, सरकारने अनेक कंपन्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली. मात्र नफा मिळविण्याच्या उद्देशाने या कंपन्या सॅनिटायझरवर दर्शवलेल्या गोष्टींपेक्षा विषारी अल्कोहोलचा वापर करत आहेत. तर काही कंपन्या योग्य प्रमाणात वस्तूंचा वापर करत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या फसवूणकीसह त्यांच्या शरीराला अपाय होण्याची शक्‍यता असल्याचे भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या (सीजीआयएस) तपासणीतून समोर आले आहे. 

सीजीएसआयने केलेल्या अभ्यासानुसार 122 पैकी 5 नमुन्यांमध्ये विषारी मिथेनॉल अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. या विषारी अल्कोहल वापरण्यास बंदी असताना अनेक छोट्या मोठ्या कंपन्या अजूनही मिथेनॉल अल्कोहोलचा वापर करत आहेत. तर 45 सॅनिटायझरवरील खुणपट्टी आणि सॅनिटायझरमधील घटकांमध्ये फरक आणि त्यांच्या प्रमाणामध्ये भिन्नता दिसून येते. देशातील सर्वात जुन्या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासानुसार मुंबई आणि ठाण्यात 122 सॅनिटायझरची पाहणी केली. ही सॅनिटायझर दुकाने, मॉल, मेडिकल येथून खरेदी केले होते. त्यातील सुमारे 50 टक्के सॅनिटायझरमध्ये चार टक्के विषारी मिथेनॉल अल्कोहोल आढळून आले. यामुळे ऑप्टिक मज्जातंतू खराब होणे आणि अंधत्व यासारखे गंभीर दुष्परिणामाला ग्राहकाला सामोरे जावे लागू शकते. मिथेनॉल शरीरात शोषून घेतले जाते, अधिक संसर्गाच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, तंद्री, मळमळ, उलट्या, अस्पष्ट दृष्टी, अंधत्व, कोमा आणि मृत्यू यांचा समावेश असू शकतो. पूर्वी अस्तित्वात असलेल्या त्वचेचे विकार किंवा डोळ्यांची समस्या यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात. असेही सीजीएसआयचे सचिव मनोहर कामत यांनी सांगितले. 

मानकांचे उल्लंघन 
सीजीआयएस प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, 37 टक्के सॅनिटायझर मधील अल्कोहोलचे प्रमाण त्याच्या दर्शनी भागात नमुद केलेल्या घटकांशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. तर 10 टक्के कोणत्याही दाव्यांशिवाय विकले गेले तर एक विशिष्ट प्रकारचे सॅनिटायझर हे विषाणूंचा नष्ट करण्यासाठी कुचकामी असल्याचे समोर आले आहे. 
 

अनेक कंपन्या उत्पादनावर लिहिलेल्या दर्शनी भागातील तपशीलांचे पालन करत नसल्याचे यातून समोर आले आहे. सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये. यासाठी अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना सरकारकडून सॅनिटायझर बनविण्याची परवानगी देण्यात आली. मात्र उत्पादकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि लगेच पैसे कमविण्याच्या उद्देशाने व्यवसायात प्रवेश केला आहे. भेसळयुक्त सॅनिटायझर ओळखणे कठीण असल्याने नागरिकांकडून घेत असलेल्या रकमेच्या मोबदल्यात कंपन्यांकडून त्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळेच हा अहवाल बुधवारी अन्न व औषध प्रशासनाकडे सादर केला असून, त्यांच्याकडून आवश्‍यक ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 
- मनोहर कामत, सचिव, भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था (सीजीएसआय) 
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com