संजय पवारांचा पराभव सतेज पाटलांच्या जिव्हारी; काय आहे मुन्ना विरुद्ध बंटी वाद?

sanjay pawar dhananjay mahadik satej patil
sanjay pawar dhananjay mahadik satej patilesakal

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. विशेषतः कोल्हापूरमधून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर संपूर्ण राज्यच लक्ष लागून होतं. मात्र आज भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या वर विजय मिळवत राज्यसभेवर पहिल्यांदाच कोल्हापूरचं नाव कोरलं.

राज्यात राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्या तशा विविध नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. सुरवातीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा अपक्ष लढवणार असल्याचे घोषित केले. यानंतर त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबाही दर्शवला. मात्र ऐनवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीन त्यांना डावलल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. या राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेनं कोल्हापुरातून राज्यसभेसाठी संजय पवारांचे नाव दिले. यानंतर राजकीय चाल खेळत भाजपाने पुन्हा एकदा महाडिकांना पुढे करत धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली.

sanjay pawar dhananjay mahadik satej patil
राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती; स्वराज्य या संघटनेची घोषणा

सतेजदरम्यान, कोल्हापूर या निवडणुकीचा राजकीय आखाडा बनला होता. भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील समीकरणं जुळवताना दिसले. मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा कोल्हापुरातील जुना संघर्ष असून या लढतीनंतर हा संघर्ष अजून तापणार की काय अशी शंका उपस्थित केली जात होती.

महाराष्ट्रात कोल्हापूरला राजकीय बदलापूर म्हणून ओळखलं जातं. इथं राजकीय पराभवाची परतफेड व्याजासहित केली जाते असं म्हटंल जातं. मुन्ना महाडिक यांच्या कुटुंबातील सर्वच पदे घालवण्याचा पराक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला . जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गोकुळची निवडणुक असो किंवा मग विधानसभा निवडणुक असो येथील प्रत्येक पदावरून पाटलांनी महाडिक हे नाव बाजूला केलं आहे. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले मल्ल असले तरी सध्या राजकीय परिस्थीनुसार त्यांच्या मैत्रीचं दुश्मनीत रुंपातर झालं आहे.

हे होण्यामागे राजकीय घडामोडींच षडयंत्र असल्याचं बोललं जातं. २००४ साली शिवसेनेतून पराभव झाल्यानंतर धनंजय महाडिक २०१४ ला पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणुक रिंगणात उतरले. त्यावेळी सतेज पाटील यांनी महाडिकांना मदत केली होती. देशात मोदी लाट असूनही धनंजय महाडिक विजयी झाले होते. मात्र पुढे विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचा गेम झाला. सतेज पाटील यांच्या विरोधात धनंजय महाडिकांचे चुलतभाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक भाजपकडून रिंगणात उतरले. आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटीलांचा दारून पराभव झाला होता. मात्र अमल महाडिक विजयी झाले होते. लोकसभेत मदत करुनही विधानसभेत दगाफटका झाल्यामुळे दोघांतलं शत्रुत्व वाढलं आणि गटातटाचं राजकारण सुरु झालं

sanjay pawar dhananjay mahadik satej patil
भाजपाचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांचा पराभव करण्याचा निश्चयच केला. सतेज पाटील यांनी त्यानंतर विधानपरिषद, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ, पदवीधर मतदारसंघ या सर्व निवडणुकीत महाडिकांना पराभवाचे धक्के दिले. यानंतर सातत्याने सतेज पाटील यांच्या नावावर कोल्हापुरात गुलालाची उधळण होतच राहिली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही सतेज पाटील यांनी विजयाची मूहर्तमेढ कायम ठेवली आहे.

आता पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कोल्हापूरकडे लागलं आहे. भाजपकडे दोन उमेदवार निवडून येतील इतकं आणि आघाडीतील तीन पक्षांकडे एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. सहाव्या जागेसाठी सेनेपाठोपाठ भाजपने महाडिकांना रिंगणात उतरवत राजकीय खेळी खेळली आहे. त्यामुळं आता बाजी कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. दरम्यान, महाडिकांना आपण कोल्हापूरच्या बाहेर तिकडं शिरोलीत ढकललं आहे, त्यामळे आता त्यांना पुन्हा शहरात येऊ द्यायचं नाही, असं वक्तव्य पोटनिवडणुकीत पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे आताही राज्यसभेचा गुलाल महाडिक यांना लागू नये म्हणून पालकमंत्री पाटील प्रयत्न करणार असल्याची चर्चा होती.

म्हणूनच आज संजय पवार यांचा पराभव हा शिवसेनेसोबतच काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे असं कोल्हापुरात बोललं जात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com