.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई: विधानसभा निवडणुकीत १६० उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्याच्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानंतर त्याच व्यक्ती उद्धव ठाकरे यांनासुद्धा भेटल्या होत्या आणि त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक जिंकून देण्याची हमी दिली होती, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.