सांताक्रूझ परिसर बनला कोरोना हॉट स्पॉट 

hotsport
hotsport
Updated on

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने मुंबई हे राज्यातील कोरोनाचे केंद्र बनले आहे. मुंबईतील वांद्रे आणि सांताक्रूझ हे भाग कोरोनाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. 

मुंबईतील एच पूर्व आणि एच पश्‍चिम हे दोन्ही प्रभाग कोरोना हॉट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 10 एप्रिलपर्यंत एच पूर्व प्रभागात 59 आणि एच पश्‍चिम प्रभागात 25 नवे कोरोनाबाधित सापडले. वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर, खेरवाडी, वांद्रे टर्मिनस, धारावी कॉलनी, सांताक्रूझ, विद्यानगरी या भागांचा एच पूर्व प्रभागात समावेश आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक 60 टक्के कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडले आहेत. धारावीत शनिवारी चौथ्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सांताक्रूझ आणि धारावी भागांत नागरिकांचे स्क्रीनिंग केले. त्यासाठी दोन डॉक्‍टर, दोन परिचारिका आणि एक महापालिका कर्मचारी असा पाच जणांचा समावेश असलेली 10 पथके नेमण्यात आली आहेत. 

वांद्रे परिसरातील 11 हजार 262 घरांतील 45 हजार नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. वाकोला, गोळीबार रोड आणि शांतिलाल कंपाऊंड या भागांत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पहिल्या टप्प्यात 50 हजार व्यक्तींचे स्क्रीनिंग आठ ते 10 दिवसांत पूर्ण केले जाईल, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com