चिकूची आवक 30 टक्‍क्‍यांनी घटली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा चिकूची आवक घटली आहे. चिकूचा वाशी बाजारातील खरा हंगाम दिवाळीत सुरू होतो. परंतु सध्या ही आवक 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा चिकूची आवक घटली आहे. चिकूचा वाशी बाजारातील खरा हंगाम दिवाळीत सुरू होतो. परंतु सध्या ही आवक 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. सध्या बाजारात डहाणू, पालघर येथील बोर्डी येथून चिकू दाखल होत असून, केवळ एक ते दोन गाड्या दाखल होत आहेत. चिकूच्या आठ ते चौदा डझनला 100 ते 500 रुपये; तर किरकोळ बाजारात एका डझनला 20 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? कवितांनी फुलले हास्याचे कारंजे

अवकाळी पावसामुळे चिकूच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत चिकूची आवक जवळपास 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे, अशी माहिती व्यापारी आनंदा बोजहाडे यांनी दिली. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे बोर्डी येथून दाखल होणाऱ्या चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या फळामध्ये छोट्या आकाराचे किडे आढळत आहेत. त्यामुळे ही आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एपीएमसीत सध्या तीन ते चार हजार पेट्या दाखल होत आहेत. आठ ते चौदा डझनला 100 ते 500 रुपये दर मिळत आहे; तर किरकोळ बाजारात एका डझनला 20 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. चिकूमध्ये व्हिटॅमिन सी असते; जे अनेक आजारांपासून बचाव करते; तर चिकू खाल्यामुळे पचनक्रियादेखील चांगली होती. त्यामुळे चिकूच्या ज्यूसला देखील मागणी जास्त असते. मात्र, चिकूची आवक कमी झाल्यामुळे चिकूचे ज्यूसदेखील विक्रेते ठेवत नसून, ज्या ठिकाणी मिळत आहे, त्यामधील दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? निवडणूक येताच 'त्यांची' घरोघरी मांदियाळी!

अवकाळी पावसामुळे चिकूच्या पिकाला मोठा फटका बसला असून, वातावरणातील बदलामुळे त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक जवळपास 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. 
- आनंदा बोजहाडे, व्यापारी. 

चिकूला बहर येत असतानाचा अवकाळी पावसामुळे तो गळून पडला. त्यामुळे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी होत आहे. परिणामी, चिकूच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
सुरेंद्र शेळके, व्यापारी .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sapodilla Chiku's arrivals declined by 30 percent