

Sarita Mhaske Reaches Thackeray MLA Residence At Midnight
Esakal
Sarita Mhaske Contacted After Disappearing During Sena Registration मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर तथा नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कोकण भवन येथे नोंदणी करण्यासाठी गेलेल्या ६५ नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक १५७च्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या. त्या नॉट रिचेबल असल्याने ठाकरे गटाच्या ६४ नगरसेवकांनीच नोंदणी केली. दरम्यान, आता नॉटरिचेबल असणाऱ्या सरिता म्हस्के या संपर्कात असल्याचं समोर आलंय. त्या मध्यरात्री ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.