महाराष्ट्रात लागणार फेरनिवडणुका? जाणून घ्या सट्टेबाजारातील आतल्या खबरी

विशाल सवने 
Saturday, 2 November 2019

महाराष्ट्रात लागणार फेरनिवडणुका?   सट्टेबाजारात हालचालींना वेग 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अजून सत्तास्थापनेसाठी कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झालंय. निवडणुकीच्या काळात सक्रीय राहणारा सट्टेबाजार निवडणुकीच्या नंतरही अजून सक्रीय आहे. महाराष्ट्रात वर्षभरात पुन्हा निवडणूक होईल यावर आता सट्टेबाजी सुरु झालीय. सुत्रांच्या माहितीनुसार

शुक्रवारी स्थिर सरकारचा दर केवळ २० रुपये होता. तर पुन्हा निवडणुका होणार यावर 25 रूपये दर लागलाय. सट्टेबाजाराच्या मते, राज्यातील सध्याची स्थिती पाहता सरकार स्थापन झालं तरीही ते जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 2020 मध्ये निवडणूक होऊ शकते. 

आणखी बातम्या वाचा : 

ही पाहा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..

भाजप सेनेच्या सत्तासंघार्षावर काय म्हणतायत 'अण्णा हजारे'?

एकीकडे राज्यात कुणाची सत्ता येणार यावरून उत्सुकता ताणली गेलीय. महायुती की नवं राजकीय समीकरण असाही एक अंदाज बांधला जातोय. पण सट्टेबाजारानं एक पाऊल पुढे टाकत थेट फेरनिवडणुकीचा अंदाज वर्तवलाय..हा अंदाज सट्टेबाजांसाठी पैसा कमावून देणारा असला तरी राज्यासाठी मात्र नक्कीच परवडणारा नाही. 

WebTitle : satta bazar insights after election results predict reelection in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satta bazar insights after election results predict reelection in maharashtra