मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून आतापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही राबवली जाणार आहे. यासाठी नवीन कार्यपद्धतीसाठी शालेय शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केले असून, यासाठी नववी ते बारावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी)कडून तपासल्या जाणार असल्याने राज्यातील काही शिक्षणतज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत.