esakal | शालेय विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ !
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ !

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी ऊर्जा  निर्माण व्हावी यासाठी ही शपथ देण्यात आली. देशात स्वच्छता आणि प्रदूषण पसरू नये यासाठी या शपथ समारोहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही मंचावर उपस्थित होते.  

मोठी बातमी :​ खतरनाक #करोना व्हायरस : बचावासाठी मुंबईत या केल्या उपाययोजना

विद्यार्थ्याना देण्यात आली  ही शपथ : 

  • माझ्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही
  • मी प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही
  • मी आंवचे जीवन असणाऱ्या पाण्याचे रक्षण करील
  • मी ओला आणि सुका कचरा वेगळा करील आणि तो कचरा पेटीतच टाकील
  • मी पाण्याचे स्त्रोत म्हणजेच विहीर ,तळे,नदी यांच प्रदूषण करणार नाही
  • मी माझ्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि  सुंदर ठेवील
  • मी या देशातील प्राणी,पक्षी आणि जैवविविधता यांच ही रक्षण करील  
  • मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन
  • मी माझ्या जीवनात जगताना पर्यावरण पूरक दैनंदिन जीवन व्यतीत करील.

मोठी बातमी :​ 'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

काय म्हणाले उपमुख्यमंत्री:

संपूर्ण  जगावर पर्यावरण बदलाचं संकट घोंघावतंय. त्यामुळे शाळेतील मुलांना या गोष्टीचं  गांभीर्य समजलं पाहिजे आणि म्हणूनच  पर्यावरण रक्षणाची शपथ शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येते आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. २१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी या कार्यक्रमाबद्दल पर्यावरण मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
सगळया विद्यार्थ्यांच्या सहकार्याची पर्यावरणाच्या रक्षणासाठी गरज आहे असं ही अजित पवार म्हणाले.  
school students took oath of saving environment in the presence of  

loading image