esakal | लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत; पालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत; पालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे सुतोवाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत; पालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे सुतोवाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यावर पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया येउ लागल्या आहेत. लस आली नसताना शाळा सुरू करण्याची घाई का ? आमची मुले काय गिनीपिग वाटली का यांना ? असा सवाल एका पालकाने शिक्षणमंत्र्यांना ट्टिवरवर केला आहे.

ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद
 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये, यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होउ लागल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याला शिक्षक संघटना आणि पालकांकडून विरोध होउ लागला आहे. शिक्षक भारती संघटनेने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. याबरोबरच पालकांकडूनही कोरोना लस येण्यापुर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेउ नये, अशी मागणी होत आहे. अजून लस आली नाही, आणि यांना शाळा सुरू करायची घाई लागली आहे. आमची मुले काय गिनीपिग वाटली का यांना ? मुलांना जर लागण झाली तर शाळा व्यवस्थापन व शिक्षणमंत्री यांनी लेखी जबाबादरी घ्यावी, असे ट्टिव प्रसाद तुळसकर यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे.

मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

यांना शाळा सुरू करण्याची एवढी का घाई ? असा सवाल सचिन गवळी यांनी उपस्थित केला आहे. मुजोर शाळांवर कारवाई करण्यात घाई दाखवा, तिकडे का दाखवत नाही एवढी तत्परता असे त्यांनी ट्टिट केले आहे. तसेच दत्तात्रय पवार यांनीही जबाबदारी सरकारची आणि शाळा व्यवस्थापनाची असल्याचे म्हटले आहे. पालक काय वेडे नाहीत, आपल्या मुलाच्या सुसाईड नोट लिहून द्यायला, असा त्यांनी म्हटले आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image