esakal | स्विफ्ट कारच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

स्विफ्ट कारच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : भरधाव कारने (Car) दुचाकीला (bicycle) धडक दिल्‍याने दुचाकीस्‍वार निर्मलकुमार सिसोदिया (Nirmal Kumar Sisodia) (५८) यांचा रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना वाशी (Vashi) सेक्टर-१७ (Sector-17) मध्ये घडली. अपघातानंतर वाशी पोलिसांनी (Police) कार (Car) चालकाला ताब्यात घेतले आहे.

निर्मलकुमार सिसोदिया वाशी सेक्टर-१७ मध्ये कुटुंबासह राहात होते. त्‍यांचे तुर्भे जनता मार्केटमध्ये स्टील मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. २३ ऑगस्ट रोजी निर्मलकुमार सकाळी ९ वाजता मुलगा विकाससह(३०) स्कुटीवरून तुर्भे स्‍टोअर येथे निघाले होते. त्‍यांची स्कुटी वाशीतील माधवराव सिंदिया चौकात आली असताना भरधाव स्विफ्ट डिझायर कारने त्‍यांना जोरदार धडक दिली.

हेही वाचा: ग्रीन कॉरिडोअरने पोचविले यकृत; दोघांना मिळाली जगण्याची उमेद

स्कुटीवरील निर्मलकुमार व त्यांचा मुलगा विकास दोघे रस्त्यावर पडले. मात्र निर्मलकुमार कारच्या खाली आल्याने कारसोबत १० ते १५ फूट फरफटत गेले. परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दोघांना वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना, मंगळवारी दुपारी निर्मलकुमार यांचा मृत्यू झाला. वाशी पोलिसांनी अपघाताला जबाबदार असलेल्या कार चालक राकेश शर्माविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

loading image
go to top