esakal | नाशिक : ग्रीन कॉरिडोअरने पोचविले यकृत; दोघांना मिळाली जगण्याची उमेद
sakal

बोलून बातमी शोधा

liver delivered by green corridor in Nashik city

ग्रीन कॉरिडोअरने पोचविले यकृत; दोघांना मिळाली जगण्याची उमेद

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : राज्य वितरण कंपनीत कार्यरत असलेले जव्‍हार येथील किशोर शिंगाडा (वय ४३) यांच्‍या मेंदूत अचानक रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्‍यान त्‍यांना मेंदुमृत घोषित केले. नंतर शिंगाडा कुटुंबीयांचे समुपदेशन करत अवयवदानास प्रोत्‍साहित केले. त्‍यानुसार बुधवारी (ता. १) सायंकाळी उशिरा महात्‍मानगरमधील सिक्‍स सिग्‍मा हॉस्‍पिटलमधून अशोका मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये प्रत्‍यारोपण शस्त्रक्रियेसाठी यकृत ग्रीन कॉरिडोअरने नेण्यात आले. नेत्रदानही केले असून, या माध्यमातून दोघांना जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.


गेल्या २८ ऑगस्टला किशोर शिंगाडा यांच्‍या मेंदूत रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍यांना नाशिकच्‍या सिक्‍स सिग्‍मा हॉस्‍पिटलमध्ये दाखल केले होते. त्‍यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. तरीही त्‍यांची प्रकृती खालावत गेली. त्‍यांची ॲपनिॲर चाचणी केल्‍यानंतर त्‍यांना मेंदुमृत घोषित केले. त्‍यांच्‍या अवयवदानातून अन्‍य रुग्‍णांना जीवदान मिळू शकते, ही गोष्ट लक्षात घेत कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. आदिवासी भागातील कुटुंब असल्‍याने प्रारंभी कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नव्‍हता. समुपदेशनातून त्‍यांची संमती मिळविण्यात आली. यासाठी सिक्‍स सिग्‍मा हॉस्‍पिटलचे फिजिशियन डॉ. अतुल अहिरराव, डॉ. शिरीष देशपांडे, डॉ. आशिष जाधव, न्‍यूरो सर्जन डॉ. निखिल भामरे, डॉ. हर्षल चौधरी, डॉ. महावीर भंडारी, पूनम हिरे आदींनी परिश्रम घेतले. दोन्ही डोळे सुशील आय केअरमध्ये दान केले आहेत.

हेही वाचा: 'जशास तसे' उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणेंना फडणवीसांकडून बळपंधरा मिनिटांत गाठले अशोका मेडिकव्‍हर

बुधवारी सायंकाळी उशिरा ग्रीन कॉरिडोअरद्वारे अशोका मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये यकृत नेण्यात आले. सायंकाळी सात वाजून ३३ मिनिटांनी सिक्‍स सिग्‍मामधून रुग्‍णवाहिका निघाल्‍यानंतर अवघ्या १५ मिनिटांत म्हणजे ७ वाजून ४८ मिनिटांनी टीम अशोका मेडिकव्‍हर रुग्‍णालयात पोचली. प्रत्‍यारोपणासाठी मुंबईतील अपोलो हॉस्‍पिटलमधील प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉक्‍टर नाशिकला दाखल झाले होते. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली शस्‍त्रक्रिया सुरू झाली होती. रात्रभर ही शस्‍त्रक्रिया चालणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्यात आला. डॉ. तुषार संकलेचा, डॉ. जी. बी. सिंघ यांच्या देखरेखखाली डॉक्टांराची टीम उपचार करीत आहे. अमोल दुगजे यांनी समन्‍वयक म्‍हणून भूमिका बजावली, तर डॉ. सुशील पारख, सचिन बोरसे, रितेश कुमार, डॉ. सागर पालवे यांच्या प्रयत्नातून सुविधा करून दिल्‍याचे समीर तुळजापूरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात

loading image
go to top