Lok Sabha Election : जागावाटपाचा निकष २०१९चे निकाल नाही

काँग्रेसची आढावा बैठक : पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकसुरात भूमिका
Seat allotment criteria is not base on 2019 lok sabha result congress review meeting politics
Seat allotment criteria is not base on 2019 lok sabha result congress review meeting politicssakal

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात २०१९ चे निकाल हा आधार होऊ शकत नाही अन् निकषदेखील नाही.अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या बैठकीत मांडली. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणजे पाच वर्षानंतर संबंधित पक्षाची परिस्थिती तशीच राहत नाही. त्यामुळे पक्षसंघटन आणि स्थानिक परिस्थिती पाहूनच जागावाटप व्हावे असा सूर या नेत्यांनी आवळला.

आजपासून काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. प्रत्येक मतदारसंघातील सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ज्या मतदारसंघात पक्षाची स्थिती कमकुवत आहे, तिथे दौरे काढून पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही २०१९ चे निकाल हा जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहे.

Seat allotment criteria is not base on 2019 lok sabha result congress review meeting politics
Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा आहे. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते. ती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपला पराभूत करू, असा इशाराही चव्हाण यांनी यावेळी दिला.

Seat allotment criteria is not base on 2019 lok sabha result congress review meeting politics
Nagpur : युद्ध सुदानमध्ये आणि भारतातल्या भाज्यांचा रस्सा होतोय पातळ, काय आहे कारण घ्या जाणून घ्या

दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल.

देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल, याची व्यूहरचना या बैठकीत ठरविली जाणार आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com