कल्याण-डोंबिवलीत 3 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण

सातत्याने लस पुरवठा होत असल्याने केंद्रावरील गर्दी कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.
Mumbai
MumbaiSakal

डोंबिवली : कल्याण (Kalyan) डोंबिवलीत (Dombivali) उपलब्ध लस पुरवठ्यानुसार लसीकरण सूरु आहे. खासगी लसीकरण (Vaccination) केंद्र, नोकरीच्या ठिकाणीही लस उपलब्ध झाल्याने 6 लाख 83 हजार नागरिकांनी आत्तापर्यंत आपला पहिला डोस (Dose) पूर्ण केला आहे. तर 3 लाख 10 हजार नागरिकांनी लसींची (Vaccination) दुसरी मात्रा घेतली आहे. लसींचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी 50 टक्के नागरिकांनी आपला दुसरा डोस ही पूर्ण केला आहे.

कल्याण डोंबिवलीत अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत होते, लसींच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने लस येताच नागरिकांची एकच झुंबड केंद्रावर उमडत होती. मात्र या महिन्यात सातत्याने लस पुरवठा होत असल्याने केंद्रावरील गर्दी कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी खासगी रुग्णालये, केंद्र येथे सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवासास परवानगी मिळाल्याने खासगी कंपन्यांनी ही कर्मचाऱ्यांसाठी नोकरीच्या ठिकाणी लस उपलब्ध केली.

झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी मोबाईल व्हॅन द्वारे लसीकरण सेवा दिली गेली. यामुळे 9 लाख 94 हजार 154 नागरिकांना लस देण्यात यश आले आहे. यामध्ये 6 लाख 83 हजार 477 नागरिकांनी पहिला डोस, तर 3 लाख 10 हजार 677 नागरिकांनी दोन डोस पूर्ण केले आहेत. लसींचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे दुसरा डोस मिळवताना नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र 50 टक्के नागरिकांना दुसऱ्या डोसचे लक्ष पूर्ण केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी असला तरी तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांना लसमात्रा मिळावी हे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

Mumbai
मुंबईत जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होणे आवश्यक, कारण...

खासगी रुग्णालयात सशुल्क लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 1 लाख 44 हजार नागरिकांनी पैसे भरून पहिला डोस घेतला आहे. तर 83 हजार 495 नागरिकांनी पैसे भरून दुसरा डोस घेतला आहे.

1st डोस 2nd डोस एकूण

सरकारी 450686 209176 659862

घरा जवळ 57571 8199 65770

खासगी 144624 83495 228119

नोकरी जागा 30596 9807 40403

एकूण 683477 310677 994154

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com