सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीतील दिवाळी पहाट रद्द

सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीतील दिवाळी पहाट रद्द

नेहरु रोड, फडके रोडवर जमावबंदीचे आदेश

डोंबिवली : दिवाळी पहाटला श्री गणेशाचे दर्शन घेऊन नंतर फडके रोडवर (Dombivali phadke road) जमून दिवाळीचा (Diwali) आनंद साजरा करण्याची डोंबिवलीतील तरुणाईची प्रथा आहे. कोरोना (Corona virus) प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने सलग दुसऱ्यावर्षी दिवाळी पहाटचे (Diwali pahat) कार्यक्रम रद्द करण्यात आले असून डोंबिवली तील नेहरू रोड, फडके रोड व स्टेशन परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तशा आदेशाचे फलक ठाणे शहर पोलिसांनी गर्दीच्या परिसरात लावले आहेत. यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी पहाटला तरुणाईचा बहर फडके रोडवर फुलणार नाही.

गेल्या कित्येक वर्षापासून डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळी पहाटचा जल्लोष अबालवृद्धांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. केवळ डोंबिवलीतील नाही तर ठाणे, कल्याण व आजूबाजूच्या शहरातील तरुणाईही डोंबिवलीतील फडकेरोडवर दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी डोंबिवलीत हजर होते. डोंबिवलीतील गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन नंतर मित्रमैत्रीणीनी, आप्तस्वकीयांना भेटून दिवाळी पहाट साजरी केली जाते. मात्र सलग दुसर्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे ही परंपरा खंडित होत आहे. शासन निर्णयानुसार शहरातील मंदिरे खुली झाली आहेत. यामुळे भाविक, तरुण पिढी मंदिरात गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे.

दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोड येथे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. नेहरु रोड, फडके रोड व शहरातील अन्य ठिकाणी एकत्रित जमू नये. सीआरपीसी क्रं. 144 प्रमाणे जमावबंदीचा आदेश लागू असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नागरिकांना आवाहन करणारे फलक फडके रोड, मदन ठाकरे चौक, इंदिरा चौक, अप्पा दातार चौक, रामनगर स्टेशन परिसरात ठाणे शहर पोलिसांनी लावला आहे. सध्या हा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीतील दिवाळी पहाट रद्द
दुधवाल्याची हत्या, पत्नीच निघाली मास्टरमाईंड

कोरोना नियमांचे पालन करून श्री गणेश मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच दिवाळीतील सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिरात साजरे होणार आहेत. नागरिकांनी देखील कोरोना नियमांचे पालन करून यंदाची दिवाळी साजरी करावी व लवकरात लवकर यातून आपण सर्व बाहेर पडू असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थांनचे विश्वस्थ प्रवीण दुधे यांनी केले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीतील दिवाळी पहाट रद्द
"म्हणून आम्ही हारलो..."; बुमराहच्या उत्तराने पेटणार नवा वाद?

दिवाळी खरेदीसाठी गेले दोन तीन दिवसांपासून शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. येथे कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. असे असताना आता दिवाळी पहाटला तरुणाई या जमावबंदीच्या आदेशाला कसा प्रतिसाद देते हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com