

Mumbai Ahmedabad Bullet Train Security
ESakal
भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद हा ५०८ किमी लांबीचा हाय-स्पीड रेल कॉरिडॉर, आता आणखी एका महत्त्वाच्या निर्णयासह पुढे जात आहे. या मार्गाच्या एकूण सुरक्षेची जबाबदारी रेल्वे संरक्षण दल (RPF) वर सोपवली जाईल. सुरुवातीला या कॉरिडॉरवरील सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) वापरण्याचा पर्याय विचारात घेण्यात आला होता. परंतु खर्च आणि तैनाती पद्धतींमुळे अंतिम निर्णय RPF च्या बाजूने घेण्यात आला आहे.