MMRDA मेट्रो - 2 बी मार्गावर बांधणार संरक्षक भिंत; न्यायालयानं दिली परवानगी..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

न्या. आर. डी. धानुका व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला मेट्रो 2 बी मार्गिकेवरील तुर्भे आणि मंडाले येथे 50 मीटर संरक्षक भिंत घालण्याची परवानगी दिली. 

मुंबई :मुंबईत मेट्रो - 2  बी च्या तुर्भे व मंडाले या ठिकाणी प्रस्तावित बांधकामाचा काही भाग सीआरझेडमध्ये येत असल्याने 50 मीटरची संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी न्यायालयालकडून देण्यात आली आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) डी.एन. नगर ते मंडालेदरम्यानच्या मेट्रो- 2 बी मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. 

डी.एन. नगर ते मंडालेदरम्यान 23.63 किमी उन्नत मार्गिका तयार होणार असून या संपूर्ण मार्गिकेदरम्यान एकूण 22 स्थानके असणार आहेत. 

हेही वाचा: मोठी दिलासादायक बातमी! मुंबईतील 'या' दोन विभागांनी गाठले शतक; वाचा सविस्तर बातमी..

 अंधेरी येथील सीआरझेड- 1 मध्ये येणारे स्वामी समर्थ नगर येथून मेट्रो - 6 च्या मार्गिकेचे काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला शुक्रवारी परवानगी दिल्यानंतर न्यायालयाने खारफुटी असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यास मनाई केली. तसेच विकासकामांसाठी खारफुटी तोडायची असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.

दरम्यान, 23.6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिका 2 बी डी. एन. नगर, अंधेरी ते मंडाले या पूर्व उपनगरांना जोडते तर 14. 5 किलोमीटर लांबीची मेट्रो -6 मार्गिका स्वामी समर्थ नगर, अंधेरी ते विक्रोळी या दोन ठिकाणांना जोडते.  न्या. आर. डी. धानुका व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला मेट्रो 2 बी मार्गिकेवरील तुर्भे आणि मंडाले येथे 50 मीटर संरक्षक भिंत घालण्याची परवानगी दिली. 

हेही वाचा: आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम; पावसासाठी आता पुढील महिन्याचीच प्रतिक्षा...  

दोन्ही प्रकल्प 310 कि.मी. लांबीच्या मेट्रो जाळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे म्हणत न्यायालयाने एमएमआरडीएला मेट्रो-6 व मेट्रो-2 बी मार्गिकवर बांधकाम करण्यास परवानगी दिली असल्याचे एमएमआरडीए  प्रवक्त्यांनी सांगितले.

security wall will build in metro 2 b project  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security wall will build in metro 2 b project