वसईत बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे, कोरोनाकाळात आर्थिक बळ

self employment
self employment

वसई : कोरोनाकाळात संसाराचा गाढा हाकताना आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे. वसईच्या समुद्धी महिला बचत गटाच्या किरण बडे यांनी महिलांना स्वयंरोजगाराचे धडे दिले असून त्यांना व्यवसायासाठी सकारात्मक दिशा दाखवली आहे. यामुळे वसई-विरारमधील 450 महिलांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक बळ मिळाले आहे. 

पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या किरण बडे या कापडी पिशव्या, मास्क तसेच इमिटेशन ज्वेलरी, ब्युटी पार्लर, टेलरिंग यासह विविध व्यवसायाचे प्रक्षिक्षण महिलांना देत आहेत. आतापर्यंत समुद्धी महिला बचत गटाच्या माध्यमातून 8 हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल लंडनमधूनदेखील घेण्यात आली. या देशातून विद्यार्थी पर्यावरण विषयावर अभ्यास करण्यासाठी बडे यांना भेटले होते. 

या माध्यमातून कापडी पिशव्या, मास्क तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील भारोळ, सायवन, जांभुळपाडा, रानगाव, देवाळे, नालासोपारा, विरारमधील 450 महिलांनी तयार केलेल्या उत्पादनातून महिलांना उत्पनाचे साधन प्राप्त झाले आहे. याद्वारे एकूण 9 हजार मास्क, 35 हजार कापडी पिशव्या तयार केले गेले आहेत. प्रिंटिंग बंद असल्याने कापडी पिशव्यांना साध्या पद्धतीने तयार करण्यात आल्या. या माध्यमातून काही महिलांना शिवणकामासाठी मशीनदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विधवा, निराधार, घटस्फोटित यांसह अन्य महिला घरीच राहून काम करत आहेत. 

बडे यांनी इथवर न थांबता या महिलांना ऑनलाईन व्यवसायदेखील उपलब्ध करून दिला आहे. येत्या 29 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत नमस्ते भारत इंटरनॅशनल ऑनलाईन बाजारपेठ होणार असून यात समुद्धी महिला बचत गटाचे 21 स्टॉल्स असणार आहेत. याद्वारे एकूण 35 महिला व्यवसाय करणार आहेत. 

महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोरोना काळात आर्थिक, मानसिक परिस्थिती बिकट झाली; परंतु याच वेळी महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे, व्यवसाय देणे असे प्रयत्न केले. शेकडो महिलांना पैसे कमावण्याची संधी त्यांच्या मेहनतीमुळे मिळाली. 
- किरण बडे, अध्यक्षा, समृद्धी महिला बचत गट 


मॉरिशसची बाजारपेठ 
2019 साली या माध्यमातून वसईच्या 8 महिलांना थेट मॉरिशस येथे भारतीय पद्धतीने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली होती. कुडते, कापडी पिशव्या, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, हाताने तयार केलेल्या नक्षीदार साड्या, ज्वेलरी यांसह विविध वस्तूंचा यात समावेश होता. 

(संपादन : वैभव गाटे)

Self employment to women found in financial crisis in vasai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com