Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

CSMT Railway Station Free Wifi: रेल्वे स्टेशनवर असलेल्या 'फ्री वाय-फाय' सेवेचा वापर वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला महागात पडल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये सायबर भामट्यांनी फोन हॅक करून लाखो रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे.
CSMT Railway Station Free Wifi Scam

CSMT Railway Station Free Wifi Scam

ESakal

Updated on

मुंबई : अनेकांना फ्री वायफाय मिळताच तो आपल्या फोनमध्ये कनेक्ट करून वापरण्याची सवय असते. मात्र ही सवय तुम्हाला मोठा धक्का देऊ शकते. असाच एक प्रकार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनवर उपलब्ध असलेल्या 'मोफत वाय-फाय' सेवेचा वापर एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला अत्यंत महागात पडला आहे. ज्यामध्ये फोन हॅक होताच लाखो रुपये लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com