मुंबई - सोशल मीडियावर ओळख झालेल्या चार आभासी मैत्रिणींनी एका ज्येष्ठ नागरिकाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करून तब्बल नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही फसवणूक सुरू होती. संबंधित ज्येष्ठ नागरिकाला स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच वृद्धाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.