esakal | मुंबईतील उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण; नुकतीच मंत्रालयातील बैठकीतही होते उपस्थित...
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

कोरोनाची लागण झालेले हे अधिकारी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत सर्वत्र ठिकाणी स्वतः मैदानात उतरून काम करत होते. त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आला असता गुरुवारीच ते सुट्टीवर गेले. हे अधिकारी महापालिका व मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचे कामही करत होते.

मुंबईतील उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण; नुकतीच मंत्रालयातील बैठकीतही होते उपस्थित...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : मुंबईतील कोरोनाची संख्या काही प्रमाणात आटोक्यात असली तरी दररोज सरासरी 1200 रुग्णांची नोंद मुंबईत होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच आरोग्य कर्मचारी, पोलिस या कोरोना योद्ध्यांनाही कोरोनाला दोन हात करावे लागत आहे. त्यातच आता पोलिस दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात आयोजित बैठकीतही ते उपस्थित होते. गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले आहेत.

व्हिडिओ: दिल्ली-मुंबई प्रवास अवघ्या १३ तासात, गडकरींनी शेअर केली ब्लू-प्रिंट

विशेष म्हणजे या अधिकाऱ्याच्या रिडरसह चार अधिकारी-कर्मचारीही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. त्यातच या अधिकाऱ्याची काही दिवसांपूर्वीच काही मंत्री तसेच अधिकाऱ्यांसोबत एका महत्वाच्या विषयावर बैठक पार पडली होती. त्यात दोन मंत्र्यांसह मुस्लिम धर्मगुरूही सहभागी झाले होते. मुंबई पोलिस दलातील दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांच्यावर होती. सध्या पोलिस दलाची धुरा पोलिस आयुक्त आणि तीन सह-पोलिस आयुक्तांवर आहे. त्यांच्या कार्यालय परिसरात निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यांचा पदभार सहपोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे) राजवर्धन सिन्हा याच्याकडे सोपण्यात आला आहे. 

धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक

कोरोनाची लागण झालेले हे अधिकारी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत सर्वत्र ठिकाणी स्वतः मैदानात उतरून काम करत होते. त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आला असता गुरुवारीच ते सुट्टीवर गेले. हे अधिकारी महापालिका व मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचे कामही करत होते. अनेक बैठकांना त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. 1995 बॅचचे हे अधिकारी कन्टेन्मेंट झोनमध्येही बंदोबस्ताची पाहणी करत होते. याशिवाय नुकतीच उत्तर मुंबईतील कन्टेन्मेट झोनध्येही त्यांनी भेट दिली होती. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती होतेय कमी, होय 'हे' आता सिद्ध झालंय...

एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
दरम्यान, घाटकोपर येथील 54 वर्षीय पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 50 वर पोहोचला आहे. घाटकोपर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले मृत पोलिस हवालदार ठाण्यातील रहिवासी होते. 28 एप्रिलपासून सुटीवर होते, पण हजेरीसाठी पोलिस ठाण्याला भेट देत होते. त्यांना ताप आल्यामुळे दोन दिवस त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. मंगळवारी त्यांना श्वासाला त्रास होऊ लागल्यानंतर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image