esakal | सर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर

आज मुंबईत एक मोठी राजकीय घडामोड घडलीये. अर्थात मोठी घडामोड म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचेच नातू पार्थ पवार यांना सुनावलेले खडेबोल

सर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज मुंबईत एक मोठी राजकीय घडामोड घडलीये. अर्थात मोठी घडामोड म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचेच नातू पार्थ पवार यांना सुनावलेले खडेबोल. पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केलेली.  त्याबाबतचे पत्रही पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. यावर आज शरद पवार यांना विचारलं असता, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही" असं थेट विधान शरद पवार यांनी केलं. पार्थ पवार हे इमॅच्यूअर आहेत, असंही शरद पवार म्हणालेत. 

दरम्यान, आजच्या शरद पवारांच्या विधानानंतर आता शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडतेय. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पोचोचलेत. 

आज शरद पवारांनी पार्थ पवार यांच्याबद्दल सार्वजनिक पातळीवर मांडलेल्या आपल्या मतानंतर आता 'सिल्व्हर ओक'वर होणारी बैठक शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत.   

महत्त्वाच्या संबंधित बातम्या : 

-- VIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"

-- बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार लवकर निघून गेलेत, यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात...

senior ncp leader ajit pawar reached silver oak to meet ncp chief sharad pawar