esakal | गिरणी कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या पुष्पा भावे यांचं निधन

बोलून बातमी शोधा

गिरणी कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या पुष्पा भावे यांचं निधन

स्वतःला अंधश्रद्धांविरोधात झोकून देत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं.

गिरणी कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या पुष्पा भावे यांचं निधन

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबईत  कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या, कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या, गिरणी कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या चळवळीला दिशा देणाऱ्या, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं मुंबईत निधन झालं. मध्यरात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुष्पा भावे यांचं वय ८१ वर्ष होतं. दीर्घ आजाराने त्यांचं रात्री १२.३० वाजता मुंबईत निधन झालंय. मुंबईतील शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही पुष्पा भावे यांनी आमूलाग्र काम केलं. स्वतःला अंधश्रद्धांविरोधात झोकून देत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं.

पुष्पा भावे यांची पुस्तके : 

  • आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
  • गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित)
  • रंग नाटकाचे

विद्यार्थीदशेपासूनच पुष्पा भावे विविध चळवळींशी जोडल्या गेलेल्या. भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यांनतर पुष्पा भावे या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्यात. गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, लोकशाहीवादी चळवळी, राष्ट्र सेवा दल अशा अनेक आंदोलन आणि चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता.  

डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत  

मिळालेले पुरस्कार

  • समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार
  • अनंतराव भालेराव स्मृति पुरस्कार
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा 'राजर्षी शाहू पुरस्कार'
  • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुष्पाताई भावे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्राध्यापक पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची,  दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढयाची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

खालील बातम्याही वाचा :

-- पिचकारी बहाद्दरांवरही पालिकेचा कारवाईचा दंडुका; 14 दिवसांत दीड लाखाची दंड वसुली

-- सहा महिन्यांपासून वेतनच नाही! 'कोरोना योद्धा' टीएमटी कर्मचाऱ्यांची उपासमार

-- लिंकअभावी अंतिम वर्षाचे विद्यार्थी चिंतेत; मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका

-- स्थानिक ठेकेदारांचा जेएसडब्ल्यूचा गेट बंदचा इशारा; आमदार रवीशेठ पाटील, महेंद्र दळवी यांचा पाठिंबा

-- मुंबईत 24 फायर बाईक; अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवणार

-- अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांत मुंबई दुसऱ्या स्थानी!

-- शिवसेना बिहारमध्ये विधानसभेच्या ५० जागा लढवण्याच्या तयारीत

senior social activist and writer pushpa bhave passed away