esakal | बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येने विरार मध्ये खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येने विरार मध्ये खळबळ

sakal_logo
By
संदिप पंडित

विरार : भाईंदर वसई (Vasai) पोलीस (Police) आयुक्तालयाच्या स्थापने नंतर या परिसरातील गुन्हेगारीला आळा बसून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलीस (Police) आयुक्तालयाच्या स्थापने नंतरही गुन्हेगारीत वाढ होतानाच दिसत आहे. आज पहाटे विरार (Virar) येथील बांधकाम(Construction) व्यावसायिक (Business) निशांत कदमची रस्त्यात अडवून धारदार शस्राने सपासप वार करून हत्या केल्याने विरार मध्ये खळबळ उडाली आहे.

विरार पूर्वेला असलेल्या फुलपाड्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अगदी महापालिका परिवहन सेवेचा रिंगरुट मार्गावरही अतिक्रमण करून बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. निशांत कदम हा बांधकाम व्यावसायिक असल्याने व्यावसायिक दुष्मनीतून हि हत्या करण्यात आली आहे की, खंडणीतून हे मात्र समजू शकले नाही.मध्यरात्री तीन च्या सुमारास निशांत कदम फुलपाड्यात येत असताना त्याला रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार शस्राने सपासप वार करण्यात आले. आणि रक्ताच्या थारोळ्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ही घटना वाऱ्यासारखी विरार शहरात पसरल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु आहे.

हेही वाचा: विमानतळ पोलीस ठाण्याचे नव्या जागी; आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

मिरा - भाईंदर, वसई - विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापने नंतर पोलीस ठाणे तसेच पोलीस संख्येत वाढ झाल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र विरार, तुळींज, वालिव पोलीस ठाण्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

loading image
go to top