जागतिक अस्थिरतेमुळे सेन्सेक्‍सची 600 अंशांनी गटांगळी!

कृष्ण जोशी
Wednesday, 28 October 2020

जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे बुधवारी (ता.28) भारतीय शेअर बाजारांमध्ये सुमारे दीड टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 599.46 अंशांनी घसरून 39,922.46 अंशांवर स्थिरावला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159.80 अंशांनी घसरून 11,729.60 अंशांवर बंद झाला. 

मुंबई : जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे बुधवारी (ता.28) भारतीय शेअर बाजारांमध्ये सुमारे दीड टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 599.46 अंशांनी घसरून 39,922.46 अंशांवर स्थिरावला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159.80 अंशांनी घसरून 11,729.60 अंशांवर बंद झाला. 

अधिक वाचा : तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्‍चितता, तसेच युरोप अमेरिकेतील कोविड रुग्णांची वाढती संख्या, यामुळे सर्वच शेअर बाजारांमध्ये अस्थिर वातावरण आहे. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारांमध्ये उमटून बॅंका व आर्थिक संस्था, औषध कंपन्या, तसेच धातू आणि आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री झाली. निफ्टीमधील प्रमुख 50 कंपन्यांपैकी केवळ नऊ कंपन्यांचे समभाग वाढ दर्शवीत बंद झाले.

अधिक वाचा : वाशी रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड; डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती

सेन्सेक्‍समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी भारती एअरटेल सव्वाचार टक्के वाढीसह 451 रुपयांवर बंद झाला. एअरटेलमधील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढविल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांनी या समभागांची खरेदी केली; तर महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती व लार्सन टुब्रो हे समभाग देखील किरकोळ वाढ दाखवीत बंद झाले. इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक व टेक महिंद्र यांच्यात तीन टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त घसरण झाली. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, टाटा स्टील, एचसीएल टेक व स्टेट बॅंक यांच्या दरातही दोन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पडझड झाली. 
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex falls by 600 points due to global instability