मैलापाणी थेट नदी-नाल्यांत; मुंबईत 76.94 टक्के मैलापाणीच प्रक्रिया केंद्रांपर्यंत

समीर सुर्वे
Monday, 30 November 2020

मुंबईत रोज 644 दशलक्ष लिटर मैला पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जात आहे. शहरात सुमारे 2800 दशलक्ष लिटर मैलापाण्याची निर्मिती होते. शहरात उपलब्ध असलेल्या मैलाप्रक्रिया केंद्राचा उपयोग फक्त 52.9 टक्के होत आहे.

मुंबई : मुंबईत रोज 644 दशलक्ष लिटर मैला पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जात आहे. शहरात सुमारे 2800 दशलक्ष लिटर मैलापाण्याची निर्मिती होते. शहरात उपलब्ध असलेल्या मैलाप्रक्रिया केंद्राचा उपयोग फक्त 52.9 टक्के होत आहे.

जीवनशैली आणि बिघडलेले आरोग्य कोरोना मृत्यूदर वाढवण्याचे प्रमुख कारण

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या निकषानुसार 100 टक्के मलजलावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तसेच किमान 20 टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे; मात्र महापालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार मलनि:सारण प्रकल्पाच्या क्षमतेची उपयुक्तता 52.9 टक्के आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार ती 100 टक्के असणे गरजेचे आहे. शहरात तयार होणारे 100 टक्के मैलापाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत आणणे बंधनकारक आहे; मात्र मुंबईत 76.94 टक्के मैलापाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत आणले जाते, अशी माहिती महापालिकेने जाहीर केली आहे. 

एन्रॉन विरोधी लढ्याचे अग्रणी सुरेंद्र थत्ते यांचे निधन

प्रक्रिया केंद्रात येत नसलेले पाणी नदी-नाल्यांमध्ये थेट जात असल्याने नैसर्गिक स्त्रोत दूषित होतात. मिठी नदीच्या दूषितीकरणावरून सध्या महापालिकेला चांगलाच भुर्दंड सोसावा लागत आहे. हरित लवादाच्या आदेशाने महापालिकेला महिन्याला 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागत आहे. तसेच मुंबईतील पर्जन्यवाहिन्या या प्रामुख्याने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या आहेत. मात्र, त्यात मैलापाणीही जात असल्याने त्यांच्या वहन क्षमतेवरही परिणाम होतो. 

150 विक्रेत्यांना लागण; संक्रमण रोखण्यासाठी पालिकेचा कोरोना चाचण्यांवर भर

चार टक्के पाण्याचा पुनर्वापर 
केंद्र सरकारच्या निकषानुसार प्रक्रिया केलेल्या 20 टक्के पाण्याचा पुनर्वापर होणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला फक्त चार टक्के पाण्याचा पुनर्वापर होत आहे. हे पाणी प्रामुख्याने औद्योगिक आणि उद्यानासाठी वापरले अपेक्षित आहे. महापालिका फक्त महालक्ष्मी येथील रेसकोर्स तसेच काही ठिकाणी प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पुरवते.

--------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sewage directly into rivers and streams; In Mumbai, only 76.94 per cent sewage treatment plants