महिला पत्रकाराला पाठवत होता अश्‍लील संदेश... नंतर काय झाले पाहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

महिलांचा लैंगिक छळ डॉक्‍टरसह दोघे अटकेत

मुंबई ः महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वांद्रे येथून एक डॉक्‍टर व एक फेरीवाला यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या फेरीवाल्याने महिला पत्रकाराला अश्‍लील संदेश पाठवले होते.

अलिबाग-पेण मार्गावरील अपघातात दोन ठार... कसा झाला अपघात?

पन्नास वर्षीय डॉक्‍टर अकील खान हे सहा वर्षांपूर्वी एका लॅब टेक्‍निशिअनच्या संपर्कात आले होते. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली, मात्र नंतर तिने नोकरी सोडल्यावर त्या दोघांच्या भेटीगाठी कमी झाल्या. त्यामुळे या डॉक्‍टरने तिला त्रास देणे सुरु केले. अखेर तिने तक्रार केल्यावर पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

ठाणे पालिकेत सत्ताधारी, प्रशासन आमने-सामने

दुसऱ्या घटनेत महिला पत्रकाराला अश्‍लील मेसेज पाठविणाऱ्या फेरीवाल्याला पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली. बेहरामपाडा येथे राहणारा जहिरुद्दीन इद्रिसी हा फेरीवाला, या पत्रकार महिलेला गेले दोन महिने त्रास देत होता. तो तिला वारंवार व्हिडियो कॉल करून अश्‍लील मेसेज पाठवीत होता. तिने व्हिडियो कॉल न उचलल्याने त्याने तिला धमक्‍या देणे सुरु केले.

शिलाहार राजवटीच्या पाऊलखुना पुसट

दूरध्वनीला उत्तर दिले नाहीस तर आपण तुझ्या घरी येऊ, असेही त्याने धमकावले. अखेर या पत्रकाराने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी त्या दूरध्वनींचा माग काढून त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता तसेच आयटी कायद्यातील कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

Sexual harassment of women


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual harassment of women