esakal | शहापूर : रस्त्यावरील खड्डे चुकवताना कार नदीत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शहापूर : रस्त्यावरील खड्डे चुकवताना कार नदीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहापूर : रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोरील वाहनाने कट मारल्यामुळे भातसा नदीत चालकासह एक कार बुडाल्याची घटना आज तालुक्यातील सापगाव पुलावर घडली. काही स्थानिक तरुणांनी तातडीने भातसा नदीत उड्या मारून कारचालक विकास शिर्के याला नदीतून बाहेर काढले.

शहापूर ते सापगावदरम्यानच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. आज विकास शिर्के हे आपल्या कारमधून शेणवा येथून शहापूरकडे येत होते; तर दुसरी एक कार शेणव्याच्या दिशेने चालली होती. सापगाव पुलावर या दोन्ही गाड्या आल्या असता दुसऱ्या कारने खड्डे चुकविताना समोरून येणाऱ्या विकास यांच्या कारला जोरदार कट मारली. त्यामुळे विकास यांची कार पुलावरून थेट भातसा नदी पात्रात पडली. नदी काठी असलेल्या मंदिरातील तरुणांना हे दिसताच त्यांनी भातसा नदीत उडी मारून विकास यांना बाहेर काढले. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर कल्याण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा: काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!

काही काळ पाण्यावर तरंगल्यानंतर कार मात्र भातसा नदीत बुडाली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू आहे

loading image
go to top