

Shahapur Rain
ESakal
शहापूर : तालुक्यातील डोळखांब परिसरात रविवारी (ता. २६) दुपारी ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला. डोंगरदऱ्यांतून अचानक आलेल्या पाण्याच्या मोठ्या लोंढ्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. कल्याण येथून चोंढे धबधब्यावर वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांपैकी पाच जण वाहून गेले. यात आकाश देशमुख (वय २९) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला, तर दिनेश मांडलकर हा वाहून गेला आहे. इतर तिघांना वाचविण्यात यश आले आहे.